|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » दहा वर्षांनंतर लंकेचा विंडीज दौरा

दहा वर्षांनंतर लंकेचा विंडीज दौरा 

वृत्तसंस्था/ कोलंबो

येत्या जूनमध्ये लंकेचा क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर लंकेचा संघ विंडीजच्या दौऱयावर जात आहे. 2008 साली लंकन संघाने यापूर्वी विंडीज दौरा केला होता. 2008 सालातील उभय संघातील कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती पण लंकेने त्यावेळी पहिल्यांदाच विंडीजच्या भूमीवर कसोटी विजय नोंदविला होता.

2018 सालातील जून महिन्यात विंडीज आणि लंका यांच्यातील पहिली कसोटी त्रिनिदादच्या क्विन्सपार्क ओव्हल मैदानावर खेळविली जाणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना सेंट लुसियातील डरेन सॅमी क्रिकेट मैदानावर आयोजित केला आहे. उभय संघातील होणाऱया कसोटी मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोसच्या पेंग्जस्टन ओव्हल मैदानावर होईल. विंडीजचे माजी महान क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स आणि वेस्ली हॉल यांनी या मैदानावर आपल्या अव्वल कामगिरीनश इतिहास घडविला आहे.

Related posts: