|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » क्रिडा » गुलप्रीतवर दोन सामन्यांची बंदी

गुलप्रीतवर दोन सामन्यांची बंदी 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

2017-18 च्या इंडियन सुपरलीग फुटबॉल हंगामात खेळणाऱया बेंगळूर एफसी संघाचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधुवर दोन सामन्यांची बंदी आणि तीन लाख रूपये दंड अशी कारवाई अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तपालन समितीने केली आहे. मंगळवारी एआयएफएफच्या प्रवक्त्याने ही घोषणा केली.

इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवा आणि एफसी बेंगळूर यांच्यातील 30 नोव्हेंबर रोजी गोव्यातील नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुरप्रीतकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याचा अहवाल या सामन्यातील पंचांनी सादर केल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तपालन समितीने मंगळवारी गुरप्रीतवर वरील कारवाई केली. गुरप्रीतला तीन लाख रूपयांचा दंड 10 दिवसांच्या कालावधीत अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनकडे देण्याचा आदेश बजावला आहे. या कारवाईमुळे गुरूप्रितला बेंगळूर एफसीच्या येत्या शुक्रवारी आणि त्यानंतर पुढील आठवडय़ातील गुरूवारच्या सामन्यात सहभागी होता येणार नाही.

Related posts: