|Monday, October 22, 2018
You are here: Home » क्रिडा » मिलर, बेटॉन विंडीज वनडे संघात

मिलर, बेटॉन विंडीज वनडे संघात 

वृत्तसंस्था/ बार्बाडोस

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया तीन वनडे सामन्यांसाठी शुक्रवारी 15 सदस्यीय विंडीज संघाची घोषणा करण्यात आली. फिरकीपटू निकित मिलर व वेगवान गोलंदाज रोन्सफोर्ड बेटॉन यांना विंडीज संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या विंडीज संघ न्यूझीलंड दौऱयावर असून उभय संघात कसोटी मालिकेनंतर वनडे व टी-20 मालिका होणार आहे.

फिरकीपटू मिलरने 46 वनडे व 9 टी-20 सामन्यात विंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. वेगवान गोलंदाज बेटॉन आपली शेवटची वनडे झिम्बाब्वेविरुद्ध गतवर्षी खेळला होता. निवड समितीने मिलर व बेटॉनला संधी देताना अनुभवी फिरकीपटू देवेंद्र बिशून, वेगवान गोलंदाज जेरोम टेलर व मिग्युएल कमिन्स यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. कर्णधारपदाची धुरा मात्र जेसॉन होल्डरकडे कायम ठेवली आहे. शुक्रवारी निवड समितीने वनडे संघासोबत टी-20 संघही जाहीर केला आहे. टी-20 संघाचे नेतृत्व कार्लोस ब्रेथवेटकडे सोपवले असून स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने वनडे व टी-20 संघातील आपले स्थान कायम राखले आहे.

विंडीज वनडे संघ- जेसॉन होल्डर (कर्णधार), जेसॉन मोहम्मद, सुनील अंब्रीस, बेटॉन, शेनॉन गॅब्रियल, ख्रिस गेल, काईल होप, शेई होप, अल्झारी जोसेफ, लेविस, निकित मिलर, ऍश्ले नर्स, रोव्हमन पॉवेल, मर्लोन सॅम्युअल्स, केसरिक विल्यम्स.

टी-20 संघ – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युअल बद्री, बेटॉन, ख्रिस गेल, रेयाड अम्रित, फ्लेचर, जेसॉन मोहम्मद, सुनील नारायण, केरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, सॅम्युअल्स, जेरोम टेलर, वॉल्टर व केसरिक विल्यम्स.

Related posts: