लंका वनडे संघात परेरा, गुणरत्नेचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ कोलंबो
कुसल परेरा व अष्टपैलू असेला गुणरत्ने यांचे लंकन वनडे संघात पुनरागमन झाले असून भारताविरुद्ध होणाऱया तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ घोषित केल्याचे लंकन मंडळाने मंगळवारी सांगितल्s.
यावर्षी झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेवेळी धोंडशिरेची दुखापत झाल्यानंतर आतापय्त परेराने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. गेल्या जुलैमध्ये गुणरत्नेच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती. त्यातून तो पूर्ण बरा झाला असल्याने 16 सदस्यीय संघात त्याचीही निवड करण्यात आली आहे. कसोटी संघाचा कर्णधार देनेश चंडिमल याला मात्र या संघात स्थान मिळू शकले नाही. या संघाचे नेतृत्व थिसारा परेरा करणार आहे. याआधी उपुर थरंगाकडे ही जबाबदारी होती.
वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपला निवड समितीने प्राधान्य दिले असून त्याच्यावर अतिताण पडू नये यासाठी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची निवड करण्यात आली नव्हती. या वर्षात लंकेने 21 वनडे सामने गमविले आणि केवळ चार सामने जिंकले आहेत. येत्या रविवारी भारताविरुद्धचा पहिला वनडे सामना धरमशाला येथे होणार आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही होणार आहे. त्याची सुरुवात 20 डिसेंबर रोजी कटक येथील सामन्याने होणार आहे.
लंकेचा वनडे संघ : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुणतिलका, लाहिरु थिरिमने, मॅथ्यूज, गुणरत्ने, डिकवेला, चतुरंग डिसिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, समरविक्रमा, धनंजय डिसिल्वा, दुश्मंता चमीरा, सचित पथिराना, कुसल परेरा.