|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शॉर्टसर्किटने दोन दुकाने भस्मसात

शॉर्टसर्किटने दोन दुकाने भस्मसात 

लोणंद येथील घटना; सहा लाखाचे नुकसान

वार्ताहर/ लोणंद

येथील पुणे-सातारा रोडवर असणाऱया उमेश क्षीरसागर व आकाश क्षीरसागर यांच्या मालकीच्या जुन्या लाकडी व पत्र्याच्या व्यापारी गाळ्य़ांना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागून दोन्ही दुकानदारांचे सुमारे 6 लाख 14 हजार चारशे रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा, तलाठी दगडे यांनी पंचनामा केला आहे 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुणे-सातारा रोडवर असणाऱया जुन्या लाकडी व पत्र-याच्या दोन  व्यापारी गाळ्य़ांतील एका गाळ्य़ांत भाडेतत्त्वावर असणाऱया रविंद्र दत्तात्रय वाईकर यांचा धान्य, कडधान्ये, भुसार मालाचा व्यवसाय आहे. या आगीत त्यांचा 4 लाख 17 हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. तर दुसऱया गाळ्य़ांमध्ये उमेश क्षीरसागर यांचे स्वतःचे चायनीजचे दुकान आहे. त्यांचे या आगीत दुकानातील 2 सिलेंडर चायनीज बनविन्याची भांडी टेबल खुर्चा असा 1 लाख 96 हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले आहे.

पहाटे संबंधित ठिकाणी आग लागली असल्याचे लोणंद पोलीस स्टेशन येथे समजताच पो. कॉ. यशवंत महामुलकर, अविनाश शिंदे, अनिरुद्ध साळवी, मल्हारी भिसे या पोलीस कर्मचाऱयांनी व लोणंद नगरपंचायतीचे गोरख माने, पोपट क्षीरसागर, पापाभाई पानसरे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व तुषार नेवसे, पोपट राऊत, अभिजित क्षीरसागर, महेश माने, विशाल क्षीरसागर, व इतर नागरिकांच्या मदतीने खाजगी पाणी टँकर व नगरपंचायतीचा पाणी टँकर तसेच लगत असणाऱया बोअर च्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली.

पाच दिवसांपूर्वी जवळच असणाऱया कुर्ला टोबॅको या दुकानाला आग लागून आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील वाढते शहरीकरण, पाहता येथे आग्णिशामक दलाचे वाहन असणे गरजेचे आहे.

Related posts: