|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अपहरणाची फिर्याद देणाऱया महिलेवर बलात्कार

अपहरणाची फिर्याद देणाऱया महिलेवर बलात्कार 

 प्रतिनिधी/ कराड

पूर्वी अपहरणाची फिर्याद उंब्रज पोलिसांत दिलेल्या महिलेचे पुन्हा अपहरण करून तिच्यावर कोचीन येथे नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेने शहर पोलिसांत फिर्याद दिली असून फिर्यादीवरून इकबाल घाशी नावाच्या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इकबाल घाशी याच्यावर एकास महिलेचे अपहरण केल्याचा गुन्हा उंब्रज पोलिसात दाखल आहे. ती महिला 22 तारखेला आई व बहिणीसमवेत विद्यानगर-सैदापूर येथील नातेवाईकांकडे निघाली होती. त्यानंतर ती एकटीच घरी परतत असताना इकबाल घाशी याने तिला अडवले. तू माझ्यावर दाखल केलेल्या गुन्हय़ासंदर्भात बोलायचे असल्याचे सांगून त्याने महिलेस कराडच्या प्रांताधिकारी कार्यालयाजवळ बोलवले. तेथून त्याने महिलेस नांदलापूर येथे  वकिलांशी बोलायचे असल्याचे सांगून तिकडे नेले. नांदलापुरात गेल्यावर फरशी भरलेल्या ट्रकमधून महिलेस कोल्हापूर, बेळगावमार्गे कोचीनला नेले. कोचीन येथे एका हॉटेलमध्ये नेऊन महिलेस मारहाण करत दमदाटी करून बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेस संशयिताने कराडला मलकापुरातील एका लॉजमध्ये नेले. तेथे महिलेस बांधून ठेवत तुला जिवंत ठेवणार नाही. तू माझ्याशी लग्न करायचे, अशी दमदाटी करत गळय़ातील मंगळसूत्र काढून घेतले. तेथून खासगी आराम बसने संशयिताने त्या महिलेस मुंबईत नेले. तेथून पुन्हा एका बसमध्ये बसवून सोडून दिले. महिलेने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून बहिणीशी संपर्क साधल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबधित महिलेने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Related posts: