|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » औषध दुकानाला आग

औषध दुकानाला आग 

सातारा

: सायंकाळी पावणे आठच्या सुमारास अजिंक्य कॉलनी येथील विशाल मेगामार्टच्या खालील बंद औषध दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीचे लोळ बाहेर येऊ लागल्यामुळे परिसरात आग लागल्याची माहिती झाली. यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाडय़ा मागवून ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये सुमारे अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

   अचानक सायंकाळी पावणेआठच्या सुमारास बंद औषधाच्या दुकानातून धूर येऊ लागल्याने व वीज पुरवठा खंडित असल्यामुळे काय झाले ते कोणालाच कळत नव्हते. वीज मंडळाच्या रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित करणे व सुरु करणे या चक्रामध्ये या दुकानाला शॉर्टसर्किट झाले व आग लागली. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर विशाल मेगामार्ट हा मॉल आहे. परंतु वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Related posts: