|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कालिका देवस्थानचा वर्धापन दिन उत्साहात

कालिका देवस्थानचा वर्धापन दिन उत्साहात 

प्रतिनिधी/     बेळगाव

जालगार गल्ली येथील श्री कालिकादेवी देवस्थानतर्फे 41 वा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंगळवारी सकाळी 9 पासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक देवस्थानापासून भडकल गल्ली, कचेरी रोड, खडक गल्ली आदी भागातून काढण्यात आली. मिरवणुकीत दैवज्ञ ब्राह्मण समाजातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता.

सलग दोन दिवस चाललेल्या या उत्सवादरम्यान सोमवारी सकाळी 9 वा. नवचंडी, दुर्गासप्तशती, पाठवाचन आदी कार्यक्रम पार पडले. मंगळवारी पालखी, नवचंडी होम, पूर्णाहुती, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा पूजेच्या यजमानपदी दीपक कारेकर दाम्पत्याला मान देण्यात आला होता.

यावेळी समाजातील बहुसंख्य नागरिकांनी व भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी शशिकांत कारेकर, विनायक कणबर्गी, रमेश सुळेभावी, प्रमोद कोलवेकर, देविदास काकतीकर, रवी कलघटगी, प्रथमेश कारेकर, दीपक अडकुरकर यांसह समाज बांधव उपस्थित होते.

 

Related posts: