|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » एलआयसीची भांडवली बाजारात 44 हजार कोटीची गुंतवणूक

एलआयसीची भांडवली बाजारात 44 हजार कोटीची गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय आयुर्विमा महामंडळाने चालू वर्षात एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भांडवली बाजारात केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत एलआयसीने 29 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात 47 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एलआयसीकडून करण्यात आली होती.

एलआयसीने एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंतच्या सहामाहीत 39,224 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, गेल्या वर्षी या सहामाहीत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमामुळे एलआयसीकडून तेजीने गुंतवणूक करण्यात येत आहे. एलआयसी ही दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार संस्था आणि संधी असणाऱया ठिकाणी गुंतवणुकीस प्राधान्य देते असे कंपनीचे प्रमुख व्ही. के. शर्मा यांनी म्हटले.

चालू आर्थिक वर्षात कंपनीकडून उत्स्फूर्तपणे गुंतवणूक करण्यात येणार नाही. यंदा इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करण्यात येणार नाही. सध्या भांडवली बाजार आपल्या उच्चांकावर असून नेहमीप्रमाणे करण्यात येणारी गुंतवणूक चालू राहील. व्याजदरात कपात करण्यात आल्याने डेट प्रकारातील उत्पन्न घटले आहे. कंपनीकडून सरकारी सिक्युरिटीमध्ये जास्त गुंतवणूक करण्यात येते, यामुळे पॉलिसीधारक आणि निवृत्तीधारकांना सुविधा मिळणे कायम राहील. चालू वर्षात एलआयसी 10 हजार ते 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक डेट प्रकारात करेल, असे त्यांनी म्हटले.

Related posts: