|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गडचिरोलीत 7 नक्षल्यांचा खात्मा

गडचिरोलीत 7 नक्षल्यांचा खात्मा 

प्रतिनिधी / नागपूर

गडचिरोली जिह्यातील सिरोंचा तालुक्यामधील कल्लेड जंगलात बुधवारी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-60 पथकाच्या जवानांनी 7 नक्षल्यांचा खात्मा केला. यात 5 महिला तर 2 पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मागील महिन्यात 5 निरपराध नागरिकांचे हत्यासत्र चालविणाऱया नक्षल्यांना जबर फटका बसला आहे.

कल्लेड जंगलात नक्षल्यांचे शिबीर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सी-60 पथकाचे कमांडर मोतीराम मडवी यांच्या नेतफत्वाखाली नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. सकाळी साडेसहाच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये 5 महिला व 2 पुरुष नक्षल्यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित नक्षली पसार झाले.

2 डिसेंबरपासून नक्षल्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा 17 वा स्थापना सप्ताह सुरू आहे. या सप्ताहापूर्वीच नक्षल्यांनी संपूर्ण जिल्हाभरात उच्छाद मांडून पोलीस खबऱया असल्याच्या संशयावरून 5 नागरिकांची हत्या केली होती. शिवाय कोटगूल येथील भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे तर टवे येथील जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले होते. त्यामुळे पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम व पोलीस महानिरीक्षक शरद शेलार हे जिह्यात तळ “ाsकून बसले होते.

Related posts: