|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कदम बंधूंची तोफ नागपूर अधिवेशनात धडाडणार

कदम बंधूंची तोफ नागपूर अधिवेशनात धडाडणार 

वैभव माळी / पलूस

नागपूरच्या अधिवेशनात चाळीस वर्षात पहिल्यांदाच विरोधी बाकावरून पलूस व कडेगाव मतदार संघाच्या दोन आमदारांची शेतकऱयांच्या प्रश्नांवर भाजपा सरकारवर तोफ धडाडणार आहे. तशी त्यांना संधी मिळाल्याने शेतकऱयांचे प्रश्न, नोकरदारांचे प्रश्न, उद्योगाच्या अडचणी व  तळागाळातील अनेक ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणार आहेत. त्याची नुसतीच झलक आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगावात पत्रकार परिषद घेवून दाखवली आहे. 

गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासात संपूर्ण महाराष्ट्र उभा-आडवा करून पाहणाऱया या कदम बंदूंची तोफ अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारवर धडाडणार आहे. सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भाजपा सरकारने केलेली शेतकऱयांची फसवणी कर्ज माफी असू किंवा जी.एस.टी.चा खेळ असू दे या सर्व प्रश्नांना त्या ठिकाणी मुद्देसुद जाब विचार असल्याचे संकेत मिळत आहेत. आपण कुणाच्याही वाटयाला जात नाही आपल्या वाटेत कोण आले तर त्यांला सोडत नाही अशीही कदम बंधूंची न बोलता ठरलेले धोरण असावे, सांगली पासून ते दिल्ली पर्यतच्या राजकीय व्यक्तींच्या ते लक्षात देखील अनेक वेळा आणून दिलेले आहे. त्यामुळे त्यांचा नाद करण्याच्या भानगडीत कोण पडत नाही.

  राज्यासह देशात भाजपाची लाट असताना पलूस-कडेगाव मतदार संघात भरघोस मतांनी आमदार डॉ. पंतगराव कदम यांच्या विजयाचा  झेंडा फडकला. त्या पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणूकीत त्यांचे बंधू मोहनशेठ कदम हे देखील सर्व पक्षांच्या पाठीब्यावर निवडणून आले. विरोध कितीही आक्रमक असला तरी त्याला कुठे जायबंदी करायचे हे या दोन्ही बंधूंना माहिती आहेत. मतदार संघातील विकास कामे करताना कधीही मागेपुढे न पाहिलेल्या आमदार डॉ. पंतगराव कदम यांनी भाजप पक्षाच्या सत्तेच्या काळात देखील पलूस व कडेगाव मतदार संघातील विकास कामासाठी निधी खेचून आणला. अस राजकीय वजन आमदार कदम यांच्याकडे आहे.

भाजपाच्या सत्तेच्या काळात पहिल्यांदाच विरोधी बाकावर बसून आपली भूमिका मांडताना, सरकारवर टिका करण्यासाठी त्यांच्याकडे प्रश्नांची जंत्रीच आहे. येत्या एका वर्षाभरात विधानसभेचे वारे वाहणार आहे. त्याची तयारी आतापासून करण्यासाठी नागपूर अधिवेधन गाजवल्याशिवाय पर्याय देखील नाही. ही संधी सोडून न दवडता दोन्ही कदम बंधूनी सरकारवर टिकेची झोड उठवतील असे संकेत मिळत आहे. आमदार डॉ. पंतगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषद घेवून कृषी संजीवनी साठी मुदतवाढ हवी या एका प्रश्नाचे उकल केले. परंतु अनेक प्रश्न त्यांच्या जंत्रीत आहेत. आमदार मोहनशेठ कदम यांचाही राजकारणात गाढा अभ्यास आहे. त्यांना देखील सरकारवर टिकेची झोड उठवण्याची संधी मिळाली आहे. तेही आक्रमकपणे व मुद्देसूद प्रश्न उपस्थितीत करतील.

एक नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ संपली आहे. शेतकऱयांच्या खात्यावर अद्याप चालू गळीत हंगामचे पहिला हप्ता जमा झालेला नाही. कर्जमाफीची रक्कम जमा झालेले नाही. केवळ शेतीवर अंवलबून असलेले शेतकऱयांसाठी या योजनेची मुदत वाढवण्याची गरज आहे. कृषी पंपांना वीज पुरवठा मिळत नाही. महावितरण मध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. यासारखे हजारो प्रश्न दोन्ही कदम बंदू येत्या नागपूर अधिवेशनात मांडणार आहेत.

Related posts: