|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तिखाजन मये येथून आठ वर्षीय मुलासह आई बेपत्ता

तिखाजन मये येथून आठ वर्षीय मुलासह आई बेपत्ता 

प्रतिनिधी / डिचोली

मुळ नेपाळ येथील व सध्या तिखाजन मये येथे वास्तव्यास असलेल्या छबीलाल विश्वकर्मा याने आपली पत्नी व आठ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार डिचोली पोलिसांत नोंदविली आहे. त्याच्या पत्नीचे नाव सुशीला (26) व मुलाचे नाव प्रकाश (8) असून शनिवार दि. 2 डिसेंबर पासून ते बेपत्ता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सदर छबीलाल हा तिखाजन मये येथील एका फास्ट फुडवर स्वयंपाकी म्हणून काम करतो. शनिवारी (दि. 2) संध्या. 5 वा. तो कामाला जाण्यासाठी खोलीवरुन बाहेर पडला होता. तर नंतर 6 वा. त्याची पत्नी सुशीला व मुलगा प्रकाश हे दोघेही आपले कपडे घेऊन घरातून बाहेर पडले. ते कोणालाही न सांगता खोलीचा दरवाजा उघडाच सोडून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर छबीलाल याने सर्वत्र शोधाशोध करून अखेर पोलीस तक्रार दिली आहे.

यापूर्वी छबीलाल हा आपल्या कुटुंबासह मुंबईत कामाला होता. तीन महिन्यांपूर्वीच तो गोव्यात आला होता. बेपत्ता पत्नी सुशीलाला हिंदी भाषा सुद्धा येत नाही. ती मोबाईल घेऊन बेपत्ता झालेली आहे. कोणालाही ते दोघे आढळल्यास डिचोली किंवा नजीकच्या पोलीस स्थानकावर अथवा छबीलाल यांच्या (7522939398) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: