|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दर्जेदार व स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करणार

दर्जेदार व स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करणार 

प्रतिनिधी/ पणजी

वातावरणात होणारा बदल व अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचा दर्जा सध्या खालावला आहे. त्यामुळे भाजीचा तुटवडा आहे. फलोत्पादन मंडाळातर्फे दर्जात्मक व स्वस्त दरात भाजीपाला महामंडळाच्या अंतर्गंत राज्यभर असलेल्या सुमारे 940 विक्री केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांटय़े यांनी दिली.

पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत महामंडळाचे संचालक माधव केळकर उपस्थित होते.

यासंदर्भात दर पंधरा दिवसांनी महामंडळाचे एक पथक बेळगाव येथील भाजी मार्केटला भेट देणार आहे. तसेच राज्यातील विविध भाजी विक्रेत्यांच्या नियमीत बैठकाही घेण्यात येणार असल्याचे झांटय़े यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

अवकाळी पावसामुळे भाजीचा तुटवडा

अवकाळी पावसांमुळे दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणात शेतींचे नुकसान झाले. यामुळे बेळगांवच्या मार्केटपर्यंत भाजीपाला पोहचण्याअगोदर त्याला किड लागत आहे. आणि याचा परिणाम गोव्याच्या मार्केटवरही दिसून आला. खासकरुन कांदा, गाजर, टोमॅटो व मिरची यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे असे झाल्याने आम्ही काहीच करु शकत नाही. भाजीपाल्याचा दर्जा वाढण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हल्लीच महामंडळाच्या एका पथकाने बेळगांव मार्केटला भेट देऊन पाहणी केली असता ही माहिती पुढे आली आहे, असे माधव केळकर यांनी सांगितले.

सध्या 940 महामंडळातर्फे नोंद असलेले भाजी विक्री केंदे अस्तित्वात आहे. आणखी सुमारे 400 स्टॉल्स उभारण्यासाठी अर्ज केला आहे. त्यातील 70 स्टॉल्सना तपास करुन परवानगी देण्यात आली आहे. राहिलेल्यांच्या जाग्यांची तपासणी करुन परावनगी दिली जाणार असल्याचेही केळकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

Related posts: