|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत दोन हजार लिटर फर्नेस ऑईल जप्त

वास्कोत दोन हजार लिटर फर्नेस ऑईल जप्त 

प्रतिनिधी/ वास्को

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी वास्कोत धाड घालून इंधनाचा काळा बाजार उगडकीस आणला व एका युवकालाही या प्रकरणी अटक केली. य्ािं पोलिसांनी एका पिकअपसह फर्नेस ऑईलचे दहा बॅरल जप्त केले आहेत. थ्यात दोन हजार लिटर इंधन होते.

  य्ािं कारवाईसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार वास्को खारवीवाडा भागात उगडय़ावर इंधन साठवून त्या ठिकाणी धोका निर्माण करीत असल्याची व इंधनाचा बेकायदा व्यवहार होत असल्याची माहिती पणजीतील गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. थ्यानुसार गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक लक्षी आमोणकर तसेच संजय पेडणेकर, कमलेश धारगळकर, प्रकाश उद्रकरी व आरआयबीच्या पोलिसांनी खारवीवाडा येथील कदंब शटल बस थांब्याजवळील अड्डय़ावर बुधवारी दुपारी धाड घातली. थ्या ठिकाणी एका   टाटा पिकअपमध्ये फर्नेस ऑईलचे दहा भरलेले कॅन होते.  य्ािं दहा बॅरलमध्ये प्रत्येकी 200 लिटर इंधन होते. ऱे  इंधन या पोलिसांनी जप्त केले व हा बेकायदा व्यवहार करणारा जावेद इमाम बेग मुल्ला(28) या खारवीवाडा पिशे डोंगरी भागातील युवकाला त्यांनी ताब्यात घेऊन अटक केली. य्ािं प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related posts: