|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » Top News » आधार लिंकिंगची मुदत 31 मार्चपर्यंत वाढणार

आधार लिंकिंगची मुदत 31 मार्चपर्यंत वाढणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरशी आधार लिंक करण्याची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने सर्व कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. त्यासाठी शासकीय योजना आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 पर्यंत होती. तर मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने आधार लिंकिंगची डेडलाईन वाढवण्याबाबतची अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात येणार आहे.

आधार लिंकिंगबाबत मुदतीसाठी सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत पुढील सुनावणी पुढील आठवडय़ात होणार आहे. सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आले.

Related posts: