|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » मायक्रोमॅक्स 300 कोटीची गुंतवणूक करणार

मायक्रोमॅक्स 300 कोटीची गुंतवणूक करणार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था:

ग्राहक ईलेक्ट्रॉनिक प्रकारात आपला विस्तार वाढवित वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह यांचे उत्पादन घेण्याचा निर्णय मायक्रोमॅक्सकडून घेण्यात आला. आपल्या उत्पादन प्रकल्पात 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय मायक्रोमॅक्सकडून घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षाअखेरीसपर्यंत टीव्ही बाजारातील आपला हिस्सा 7 ते 8 टक्क्यांपर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला असून वर्षात 8 लाख युनिट्सची विक्री करण्यात येईल.

गेल्या वर्षी एअर कंडिशन क्षेत्रात उतरलेली गुरुग्रामची कंपनी लवकरच नवीन मॉडेल सादर करेल. एका वर्षात ग्राहक ईलेक्ट्रॉनिक प्रकारातील 70 ते 80 टक्के उत्पादनांची निर्मिती करण्याची योजना आहे. पुढील एका वर्षात एसी, एअर कुलर, वॉशिंग यांना बाजारपेठेत दाखल करण्यात येईल. मायक्रोवेव्ह, रेफ्रिजरेटर यासारख्या उत्पादनांना मोठय़ा नियोजनाची आवश्यकता भासत असल्याने पुढील दोन वर्षात दाखल करण्यात येतील असे मायक्रोसॉफ्ट इर्न्फोमेटिक्सचे सहसंस्थापक राजेश अगरवाल यांनी सांगितले. सध्या ग्राहक ईलेक्ट्रॉनिक प्रकारात कंपनीचा हिस्सा 20 ते 25 टक्के असून पुढील तीन वर्षात तो 40 टक्क्यांपर्यंत जाईल. सध्या कंपनीचा राजस्थानातील भिवंडी, उत्तराखंडमधील रुद्रापूर आणि तेलंगणात प्रकल्प असून 200 ते 250 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे.

एसी आणि एलईडी टीव्ही क्षेत्रात कंपनीचा सध्या हिस्सा वाढत आहे. गेल्या वर्षात टीव्हीच्या 6.5 लाख युनिट्सची विक्री करण्यात आली. देशभरात दरवर्षी 11 दशलक्ष युनिट्सची विक्री करण्यात येते.

 

 

Related posts: