|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शासकीय रूग्णालयातील एक्सरे केंद्र नियमबाह्य

शासकीय रूग्णालयातील एक्सरे केंद्र नियमबाह्य 

सुरक्षा मानकांच्या पूर्ततेत कसुरी

अणुऊर्जा नियामक मंडळाची तपासणी

रामनाथ, क्रांती, चिरायु रूग्णालयांवरही कारवाई

प्रतिनिधी /चिपळूण

एक्सरे मशीन बसवण्यासाठी घालून देण्यात आलेल्या मानकांचे पालन न केल्यामुळे रत्नागिरी जिह्यातील एका एक्सरे केंद्राला सील ठोकण्यात आले असून अन्य 8 केंद्रांना सील का ठोकण्यात येऊ नये? अशी नोटीस अणुऊर्जा नियामक मंडळाने जारी केल्यानंतर रत्नागिरीतील आणखी 4 रूग्णालयांच्या एक्सरे केंद्रांवर कारवाई करण्यात आली आह़े यामध्ये रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयाचा समावेश आह़े

अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अधिकाऱयांनी यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढले आह़े त्यात त्यांनी नमूद केले आहे की, ड़ी एम़ राणे, ज़ी शिवरामण, महेश एम़ यांनी तपासणी मोहीम राबवल़ी 4 ते 7 डिसेंबर दरम्यान खेड, चिपळूण, रत्नागिरी येथील एक्सरे केंद्रांची तपासणी करण्यात आल़ी त्यापैकी 3 केंद्रांना सील ठोकण्यात आल़े पुढील टप्प्यातील कारवाई शासकीय रूग्णालय रत्नागिरी, क्रांती नर्सिंग होम रत्नागिरी, चिरायु हॉस्पीटल रत्नागिरी, श्रीरामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी येथे तपासणीनंतर कारवाई झाली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आह़े

यापूर्वी रत्नागिरी जिह्यातील खेड येथील रतनबाई घरडा हॉस्पिटल, चिपळूणचे एसएमएस हॉस्पिटल चिपळूण, एसव्ही डायग्नोस्टीक सेंटर, आदित्य आर्थोपेडीक ऍण्ड आय केअर सेंटर, मोडक हॉस्पिटल, स्कीन केअर क्लिनिक, चिपळूण- कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथील निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटर या 8 केंद्रांनी मानकांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवून अणुऊर्जा नियामक मंडळाने सील का ठोकू नये, अशी नोटीस जारी केली आहे.

चिपळूणच्या डॉ. पूजारी यांच्या कोकण डायग्नोस्टीक सेंटरने परवाना न घेता व्यवसाय सुरु केल्याने सील करण्यात आल़े अधिकाऱयांनी सांगितले की, प्रत्येक केंद्राने परवाना घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय आमचे तपासणी पथक तज्ञ ऑपरेटरची तपासणी करते. खोलीची जागा, हाताळणी करणारे तंत्रज्ञ यांची तपासणी केली जात़े रत्नागिरीतील नामवंत डॉक्टरांच्या रूग्णालयांवर कारवाई झाल़ी शिवाय जिल्हा शासकीय रूग्णालयावर कारवाई झाली असल्याने वैद्यकीय क्षेत्रा<त खळबळ उडाली आह़े

Related posts: