|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महामानवाला कँडल मार्च, प्रबोधन महाजागरने अभिवादन

महामानवाला कँडल मार्च, प्रबोधन महाजागरने अभिवादन 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

 सिध्दार्थ नगर मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कँडल मार्च काढण्यात आला. सिध्दार्थनगर येथून निघालेल्या कँडल मार्च दसरा चौक, आयोध्या टॉकीजमार्गे बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोर कँडल लावून अभिवादन केले. त्यानंतर सिध्दार्थनगरमध्ये ‘हाक बाबांची’ कार्यक्रमांतर्गत प्रबोधनाचा जागर करण्यात आला.

सिध्दार्थ नगर मंडळातर्फे काढण्यात आलेल्या कँडल मार्च रॅलीमध्ये शेकडो भीमसैनिक पांढरी वस्त्र परिधान करून ‘जय भिम’चा नारा देत सहभागी झाले होते. महिला व लहान मुलांचा उल्लेखनीय सहभाग होता. ‘हाक बाबांची’ या प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुरज पवार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नगरसेवक अफजल पिरजादे, यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, गंगाराम कांबळे यांच्या प्रतिकृती साकारून त्यांच्या विचारधारा सादर केल्या. गंगाराम कांबळे यांचे नातू राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सुरज पवार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.

Related posts: