|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी

बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी 

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव :

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्यावतीने हुबळी येथील केएससीए स्टेडियमवर सुरू असलेल्या धारवाड विभागीय वरिष्ठांच्या ब गटातील साखळी लेदर बॉल स्पर्धेत गुरुवारी बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब  संघाने युवराज स्पोर्ट्स क्लब संघावर 198 धावानी दणदणीत विजय मिळविला. शुभम गौडाडकर याने अष्टपैलू कामगिरी करताना 2 षटकारसह 12 सनसनीत चौकारासह 93 धावा व 3 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

बेळगाव स्पोर्टस् क्लब ब : 50  षटकात 5 बाद 302 धावा (ओमकार वेर्णेकर 1 षटका 9 चौकार 43, शुभम गौंडाडकर 2 षटकारासह 9 चौकार 93, अमर घाले 3 चौकार 43, बहुबली चौगला 18, आकाश नाबाद 31 धावा, युवराज स्पोर्टस् क्लबतर्फे किरण तरळेकर 2, जोतिबा गिलबिले, किरण, प्रसाद नाकाडी प्रत्येकी 1 बळी.)

युवराज स्पोर्टस् क्लब  : 23 षटकात सर्वबाद 104 धावा, (दत्तप्रसाद जांबोलेकर 20, संतोष जाधव 18, बेळगाव स्पोर्टस् क्लबतर्फे शुभम गौंडाडकर व प्रशांत एम. 3, रोहित ढवळे व प्रतिक बी प्रत्येकी 2 बळी.)