|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा उपजिल्हा इस्पितळात मलनिस्सारण प्रकल्पाला गळती

फोंडा उपजिल्हा इस्पितळात मलनिस्सारण प्रकल्पाला गळती 

प्रतिनिधी /फोंडा :

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळातच्या प्रवेशद्वरात गटारगंगा वाहू लागली आहे.   प्रवेशद्वारावर वाहणारे पाणी हे मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरमधून झिरपत असल्याने स्पष्ट झाले आहे. प्रवेशद्वरातूनच थेट ओपीडीपर्यत रूग्णांच्या ये जा असल्यामुळे संपुर्ण इस्पितळात दुर्गधीमय घाणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रूग्णांना नाकातोंडाना रूमाल बांधून इस्पितळ परीसरात वावरावे लागत आहे. या इस्पितळाला कुणीच वाली नसून असे प्रकार दर तीन चार महिन्यांनी नित्याचेच झाल्याची माहिती येथे आढावा घेतल्यानंतर कळाले.

  उपजिल्हा इस्पितळाच्या मुंख्यद्वारावर असलेला मलनिस्सारण प्रकल्पाचा चेंबर तुबला असून त्यातून दुर्गधीजनक मल मुख्यद्वाराच्या गेटसमोरून वाहत असल्याचा अनागोंदी प्रकार घडत आहे. यावर कुणाचेच लक्ष नसून हा प्रकार गेले आठ दिवस सुरू आहे. त्यामुळे या दुर्गधीमुळे इस्पितळात येणाऱया रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अशा प्रकारामुळे रोगराई पसरण्याची भीतीही रूग्णानी व्यक्त केली.

आमदाराच्या भेटीनंतरही परिस्थिती जैसे थे     

रूग्णाच्या वाढत्या तक्रारीला अनुसरून आरोग्य सेवेचा आढावा घेण्याचे काम  फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यानी काहि महिन्यापुर्वी केले हेते. या भेटी दरम्यान मलनिस्सारण प्रकल्प कुचकामी ठरत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते.  बैठकीत आरोप प्रत्यारोपाचे जबाबदारी झटकण्याचे पवित्रा संबंधित खात्याच्या अधिकाऱयानी घेतला होता. यावर उपाय म्हणून रवी नाईक यांनी सुरळीत कारभारासाठी बांधकाम खाते व साधन सुविधा महामंडळ, आरोग्य खात्याच्या संगनमताने रखडलेली कामे पुर्णत्वास नेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतू या बैठकीनंतर हालचाली थंडावल्याने कोणतीच प्रगती होऊ शकलेली नाही.

Related posts: