|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात , कुटूंब मृत्यूमुखी

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात , कुटूंब मृत्यूमुखी 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे – सातारा रस्त्यावर जांभूळवाडी इथे झालेल्या भीषण अपघातात अख्खे कुटुंब मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. दरीपुलाजवळ आज पहाटे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली.यामध्ये मुंबईच्या माने कुटुंबाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनूसार, माने कुटुंब आपल्या मुलील्या शिक्षणासाठी सातऱयाला सोडून मुंबईच्या दिशेने परत येत होते.यावेळी कारमध्ये यशवंत माने, त्यांची पत्नी शारदा आणि 20 वर्षांचा मुलगा ऋषिकेश बसले हाते.तर रामचंद्र सुर्वे हे ड्रायव्हर गाडी चालवत होते. पहाटेची वेळ होती ड्रायव्हरला आराम मिळावा यासाठी ऋषिकेशने थोडावेळ गाडी चालवायचे ठरवले आणि स्टेअरींग हातात घेतले,पण कात्रजच्या घाटात ऋषिकेशचा कारवरचा ताबा सुटला आणि कार ट्रकला जाऊन धडकली.यात यशवंत माने त्यांची पत्नी शारदा,मुलगा ऋषिकेश आणि ड्रायव्हर रामचंद्र सुर्वे या सगळय़ांचा मृत्यू झाला.सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरू आहे.