|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बीच क्लिनींग घोटाळय़ाची चौकशी करा

बीच क्लिनींग घोटाळय़ाची चौकशी करा 

 

प्रतिनिधी/ पणजी

पर्यटन खात्याने दिलेल्या बीच क्लीनीग कंत्राटमध्ये सुमारे 16 कोटींचा घोटाळा झाला आहे. लोकायुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. तरी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता तीन महिने उलटले तरी अजून मुख्यमंत्र्यांनी या विषयाची चौकशी केली नाही, असे यावेळी ‘ह्यूमन राईट्स डिफेंडर’ संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे.

 बीच क्लिनींग घोटाळय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात कंत्राटदाराने सरकारचे पैसे हडप केले आहे. याविषयी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना हे निवेदन दिले होते. आता लोकायुक्तांनी या विषयाची सखोल चौकशी करावी असा आदेशही सरकारला दिला आहे. तरी मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहे. याची चौकशी करण्यात मुख्यमंत्री टाळाटाळ करत आहे. हे सोळा करोड रुपये या कंत्राटदाराकडून कसे वसूल करणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे याची सीबीआय मार्फत चौकशी करावी. बीच क्लिनींग हा मोठा घोटाळा आहे. जनतेचे पैसे मोठय़ा प्रमाणात वाया गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयी स्पष्टीकरण द्यावे, असे यावेळी या संघटनेचे अध्यक्ष एडविनो फर्नांडिस यांनी सांगितले.

 भाजप सरकार हे भ्रष्टाचार विरोधी सरकार असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहे तर मग एवढे कराडो रुपयांचा भ्रष्टाचार कसा होत आहे. यात भाजपच्या नेत्यांचा हात आहे   या भष्टाचारामध्ये कोण कोण आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. बिच क्लिनींग कंत्राटातून कराडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला तरी मुख्यमंत्री अजून गप्प आहे जबाबर व्याक्तीवर अजून कारवाई केली जात नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे असेही  rrत्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ह्यूमन राईट डिफेंडरचे अन्य सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.