|Sunday, February 17, 2019
You are here: Home » उद्योग » कर्मचाऱयांकडील समभाग खरेदीची प्रक्रिया फ्लिपकार्टकडून पूर्ण

कर्मचाऱयांकडील समभाग खरेदीची प्रक्रिया फ्लिपकार्टकडून पूर्ण 

बेंगळूर / वृत्तसंस्था

कर्मचाऱयांकडील समभाग खरेदीची प्रक्रिया फ्लिपकार्टकडून पूर्ण करण्यात आली. कंपनी आपल्या कर्मचाऱयांकडून 100 दशलक्ष डॉलर्सचे स्टॉक ऑप्शन्स खरेदी करणार असून भारतीय स्टार्टअप इतिहासातील सर्वात मोठी खरेदी ठरणार आहे.

फ्लिपकार्ट, मिंत्रा, जबाँग आणि फोनपे या कंपन्यांतील माजी आणि आताच्या 3 हजार कर्मचाऱयांकडून शेअरची खरेदी करण्यात येईल. कंपनीने गेल्या पाच वर्षांत चारवेळा बायबॅक केले आहे. कर्मचारी ही कंपनीची सर्वात मोठी ताकद आहे. कंपनीतील कर्मचाऱयांशिवाय ई कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी उभारणे अशक्य होते. कंपनीच्या यशामध्ये कर्मचाऱयांचाही समान हिस्सा आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले. सॉफ्टबँक हे समभाग फ्लिपकार्टकडून खरेदी करेल अशी शक्यता आहे. सॉफ्टबँकेने प्रतिसमभागाची किंमत 85 ते 89 डॉलर्स निर्धारित केल्याचे सांगण्यात येत आहेत. गोल्डमॅन सॅश या गुंतवणूक बँक समभाग विक्रीसाठी मध्यस्थी करत असल्याचे समजते.

 

 

 

Related posts: