|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसला सुप्रिम कोर्टाचा धक्का; मतपडताळणी याचिका फेटाळली

काँग्रेसला सुप्रिम कोर्टाचा धक्का; मतपडताळणी याचिका फेटाळली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गुजरात विधनसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांशी जोडण्याची मागणी करणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कमीत कमी 25 टक्के व्हिव्हिपॅट पावत्यांना ईव्हीएमच्या मतांशी जोडण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोहम्मद आरिफ राजपूत यांनी केली होती. गुजरात हायकोर्टानंतर ही याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे.

‘निवडणूक प्रक्रिया सध्या चालू आहे,निवडणूक आयोग नियमांनुसार ही प्रक्रिया पूर्ण करत आहे.कोर्ट निवडणूक आयोगाच्या कामात दखल देऊ शकत नाही’ ,असा निर्णय सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले. दुसऱया टप्प्यातील मतदानानंतर राज्यामध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. ज्यात गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येईल,असे समोर आले आहे. या अंदाजानंतर काँग्रेसच्या गोटात धाकधूक वाढल्याच्sढ दिसते. 18 डिसेंबरला गुजरातचा निकाल लागणार आहे.