|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा शिपयार्ड गृहमंत्रालयासाठी 160 गस्ती जहाजे बांधणार, 830 कोटींचा करार

गोवा शिपयार्ड गृहमंत्रालयासाठी 160 गस्ती जहाजे बांधणार, 830 कोटींचा करार 

प्रतिनिधी/ वास्को

गोवा शिपयार्ड भारतीय गृह मंत्रालयासाठी 160 गस्ती जहाजे बांधणार आहे. गोवा शिपयार्डने गृहमंत्रालयाकडे यासंबंधी नुकताच करार केलेला असून 160 गस्ती जहाजे बांधणीचा हा करार 830 कोटी रूपयांचा आहे. गोवा शिपयार्डने अंदमान-निकोबार बेटासाठीही 28 मीटर लांबीच्या दहा गस्ती जहाजे बांधण्याचा करार केला आहे.

भारतीय सागरी सुरक्षेची गरज म्हणून गृहमंत्रालयाने 160 गस्ती जहाजांच्या उभारणीचा निर्णय घेतलेला असून यापैकी दहा गस्ती जहाजे अंदमान आणि निकोबार या बेटासाठी कामगारी पार पाडणार आहेत. अंदमान निकोबार बेटासाठी 28 मिटर लांबीची गस्ती जहाजे गोवा शिपयार्ड बांधणार आहे. अन्य जहाजे भारतातील सागरी राज्यांच्या गस्तीसाठी सागरी पोलिसांच्या ताफ्यात सामील करण्यात येतील. 26 11 च्या अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या सागरी सुरक्षेच्या गरजेची पुर्तता करण्याचाच गस्ती जहाजे बांधणी हा एक भाग आहे. देशातील व विदेशातील मिळून  सात जहाज बांधणी कंपन्यांमधून गोवा शिपयार्डची 160 जहाजे बांधण्यासाठी निवड झालेली आहे. ही जहाजे 12 टन वजनाची आहेत. या जहाज बांधणीच्या कामांमुळे गोवा शिपयार्डबरोबरच राज्यातील इतर लघुउद्योगांनाही लाभ होणार असल्याने आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. गोवा शिपयार्डने आतापर्यंत जहाज बांधणी क्षेत्रात भरीव प्रगती साधलेली असून दर्जेदार सुरक्षा उत्पादन देशाला दिलेले आहे. 830 कोटींच्या गृहमंत्रालयाच्या जहाज बांधणीमुळे आपल्याला समाधान वाटत असून गोवा राज्याच्या आर्थिक विकासालाही मदत होणार असल्याचे गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रियर ऍडमिरल शेखर मित्तल यांनी या विषयी बोलताना सांगीतले.

 

Related posts: