|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Automobiles » सनलेक्ट्रा ऑटोकडून जानेवारीत सोलर ई-रिक्षा बाजारात

सनलेक्ट्रा ऑटोकडून जानेवारीत सोलर ई-रिक्षा बाजारात 

 पुणे / प्रतिनिधी :

 

आर-सन इंडस्ट्रीजचे ऑटोमोबाईल डिव्हिजन असलेल्या सनलेक्ट्रा ऑटोकडून लवकरच सोलर ई-रिक्षा सादर करण्यात येणार असून, येत्या जानेवारी 2018 मध्ये  ही गाडी महाराष्ट्र, उत्तर भारतातील बाजारात दाखल होणार आहे. आर-सन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रणजित मोरे यांनी शनिवारी ही माहिती दिली.

याबाबत बोलताना मोरे म्हणाले, हे वाहन दोन प्रकारांत उपलब्ध होत आहे. यातील बाउन्सर हा प्रकार मालवाहतुकीशी संबंधित आहे. तर फायटर प्रवासी वाहतुकीकरिता आहे. या दोन्ही प्रकारातील रिक्षा इकोप्रेंडली असून, त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. त्याचबरोबर ऊर्जेचीही साधारणपणे 20 ते 25 टक्के इतकी बचत होणार आहे. फायटरमध्ये चार जण बसू शकतात. तर बाऊन्सरमध्ये 310 किमी वजन वाहण्याची क्षमता आहे. एका चार्जनंतर गाडी साधारणपणे 100 ते 120 किमी अंतरापर्यंत धावू शकेल. विविध आकर्षक रंगात या गाडय़ा उपलब्ध असतील. फायटरची किंमत 30 हजार, तर कार्गो बाऊन्सरची किंमत 90 हजार रुपये इतकी असेल. उच्च कार्यक्षमता, गुणवत्ता, आरामदायीपणा ही गाडीची वैशिष्टय़े असून, दिवसा रस्त्यावर आल्यानंतर ही सोलर ई-रिक्षा आपोआप चार्ज होत राहते. आपल्याला पारंपरिक पद्धतीने इंधनावर चालणाऱया वाहनांमध्ये वाहतुकीची सवय आहे. मात्र, इलेक्ट्रिक गतिशीलता हे भविष्य असेल. हवामानातील बदलाचाही आपल्यावर निर्णायक परिणाम दिसून येतो. हे पाहता इलेक्ट्रिक मोबिलिटी काळाची गरज बनेल. म्हणून सौर विद्युत वाहनांपासून ते मोठय़ा औद्योगिक उत्पादनांपर्यंत आम्ही सूर्यप्रकाशाभिमुख परिसंस्था उभारत आहोत. केंद्र सरकारकडून याला प्रोत्साहन दिले जात असून, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनीही यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन वर्षात सोलरवरील बस, टूव्हिलरही आणणार

इलेक्ट्रिकमध्ये विविध कंपन्या आहेत. सोलरमध्ये फ्लेक्झिबल सोलर पॅनेल टेक्नॉलॉजी केवळ आमचीच आहे. येत्या दोन वर्षांत सोलरवर बस तसेच टूव्हिलरदेखील आणण्याचे सूतोवाच त्यांनी या वेळी केले.

 

 

 

 

 

 

 

Related posts: