|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आव्हानाना सामोरे जाणारा विद्यार्थी शिक्षण संस्थानी घडवावा

आव्हानाना सामोरे जाणारा विद्यार्थी शिक्षण संस्थानी घडवावा 

वार्ताहर/ सांगरुळ

बहुविंद्य शिक्षणाचा वापर करुन देशप्रेमाने प्रेरित होणारा आव्हानाला सामोरे जाणारा विद्यार्थी शिक्षण संस्थानी घडवावा, असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री आप्पासाहेब डांगे यानी केले.

 

सांगरुळ शिक्षण संस्थेचया 59 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्ळणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर. आर. पोंदकुले होते.

यावेळी माजी मंत्री आप्पासाहेब डांगे म्हणाले, अभ्यासक्रमाबाहेर जाऊन ज्ञानदानाचे काम सांगरुळ शिक्षणसंस्थेने केल्याने तसेच स्व. डी. डी. आसंगावकर यांच्या विचाराचा वारणा जतन केल्याने संस्थेची प्रगती झाल्याचे गौरवोद्वारही माजी मंत्री डांगे यांनी काढली.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना जिल्हा न्यायाधिश आर. आर. पोंदकुळे यांनी ग्रामीण भागात सांगरुळ शिक्षण संस्थेने केल्याने तसेच स्व. डी. डी. आसंगावकर यांच्या विचारांचा वारणा जतन केल्याने संस्थेची प्रगती झाल्याचे गौरवोद्वारही माजी मंत्री डांगे यांनी काढली.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना जिल्हा न्यायाधिश आर. आर. पोंदकुले यांनी ग्रामीण भागात सांगरुळ शिक्षण संस्थेने केलेली शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक करताना सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगांवकर यांनी सांगरुळ शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढवा घेतला.

वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला. सांगरुळ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणून पाहुण्याचे स्वागत केले. पाहुण्यांच्या परिचय प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार प्रा. जयंत आसगांवकर व य. ए. खाडे यांचे हस्ते केले.

यावेळी सांगरुळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष के. ना. जाधव, संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, ऍड. प्रकाश देसाई, तुकाराम पाटील (गुरुजी), कुंभीचे संस्थाचालक अनिल पाटील, बाजीराव शेलार, नगरसेवक रत्नेश शिरोडकर, राजाराम वरुटे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन व्हि. जी. पोवार, सरपंच सदाशिव खाडे, वसंत तोडकर, रुपाली पाटील, प्राचार्य डॉ. डी. डी. कुरळपकर, संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक, आनंदा कासोटे, मदन पाटील, इंदुबाई आसगांवकर, डॉ. एम. एन. ठाणेकर,  डी. डी. पाटील, डी. जी. खाडे, दत्ता पाटील, उदय पाटील, दादासा लाड पतपेटीचे चेअरमन महादेव चौगुले, शाम कोरगांवकर, श्रीकांत हेरवाडे,  संजय जाधव, यांचेसह सांगरुळ शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेचे शाखा प्रमुख परिसरातील गावांचे सरपंच सदस्य व पदाधिकारी माजी विद्यार्थी उपस्थित होते. आभार आर. बी. गोंधळी यांनी मानले. सुत्रसंचालन सौ. निता पवार, प्रा. संतोष जाधव यांनी केली.