|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

पुण्यात नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. बाणेर परिसरातील वीरभद्र नगरमध्ये बाबुराव चांदेरे यांच्या निवास्थानी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास आयकर विभागाचे पथक येऊन धडकले. सध्या हे अधिकारी चांदोरे यांच्या घरी चौकशी करत आहेत.

बाबुराव चांदोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्ये÷ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय समजलेले जातात. चांदोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱयांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला आहे.