|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आम्हाला अंधारातून मुक्त करा

आम्हाला अंधारातून मुक्त करा 

प्रतिनिधी/ पणजी

 साकोर्डा धारबांदोडा येथील वसंत गिरोडकर कुटुंबावर सरकारने तसेच वन खात्याने अत्याचर केले असून हुकुमशाहीने त्यांची वीज जोडणी तोडण्यात आली आहे. आज गोवा स्वातंत्र्य होऊन 55 वर्षे झाली तरी या कुंटुंबावर अधांरात राहण्याची पाळी सरकारने आणली आहे, असे आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी सांगितले. वीज जोडणी तोडल्याने त्याचा निषेध करण्यासाठी काल दिवसभर गिरोडकर कुटुंब आझाद मैदानावर न्याय मिळविण्यासाठी बसले होते.

गेली 40 वर्षे वास्तव्य करणाऱया गिरोडकर कुटुंबावर सरकारने अन्याय केला आहे. गेली 40 वर्षे हे कुटुंब अंधारात होते. गेल्या चतुर्थीला त्यांना वीज जोडणी देण्यात आली होती. पण वन खात्याच्या अधिकाऱयांनी आपली  परवानगी घेतली नाही असे कारण पुढे करुन पुन्हा दिवाळीला त्ंयांची वीज जोडणी तोडण्यात आली वन्य क्षेत्रात घर येत असल्याने त्यांना वीज घेता येत नाही असे कारण पुढे केले आहे. जर आपण पर्यटकांसाठी वन्य क्षेत्रात वीज वापरु शकतो  मग भुमिपुत्रांना वीज का नाही? त्यांच्यावर असा अत्याचार का केला जात आहे? या कुटुंबाची लहान मुले शाळेत कॉलेजमध्ये जात आहेत. वीज नसल्या कारणाने त्यांना अभ्यास करण्यात अनेक अडचणी येत आहे, असेही यावेळी राजन घाटे  यांनी सांगितले.

 याविषयी स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांनी कुठलीच दखल घेतेली नाही त्यांचे कुटुंब आझाद मैदानावर आहे पण कुठल्याच लोकप्रतिनिधीने त्यांची दखल घेतली नाही. वनखात्याचे अधिकारी वसंत गिरोडकर यांच्यावर झाडे कापल्याचे खोटे आरोप करत आहेत. त्यांची छळवणूक करत आहेत. दुधाच्या उपजिवीकेवर काम करणारा हा गरीब त्याचा हातही व्यवस्थित नाही अशा वेळी तो ^झाडे का कापणार. आपल्याला वीज मिळावी यासाठी 25 हजार रुपये भरुन त्यांनी वीज खांब देण्यात आला होता. वीजही सुरु केली. वीज बिलही आले होते. एवढे असूनही अचानक त्यांची वीज तोडण्यात आली. विकसित गोव्यात आज अशा प्रकारचे जीवन त्यांना जगावे लागत आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर हे गरीब कुटुंब रस्त्यावर येणार आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष घालून त्यांना वीज मिळवून द्यावी असे यावेळी राजन घाटे यांनी सांगितले. यावेळी आझाद मैदानावर गिरोडकर सर्व कुटुंब उपस्थित होते.