|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दातखिळी बसून तरुणाचा मृत्यू

दातखिळी बसून तरुणाचा मृत्यू 

प्रतिनिधी / मालवण:

दातखिळी बसल्याने आंगणेवाडी येथील नीलेश सतीश आंगणे (38) या तरुणाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली. नीलेश याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.