|Saturday, March 23, 2019
You are here: Home » उद्योग » प्रतिवर्षी 25 लाख कार विक्रीचे मारुती सुझुकीचे लक्ष्य

प्रतिवर्षी 25 लाख कार विक्रीचे मारुती सुझुकीचे लक्ष्य 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2025 पर्यंत वार्षिक 25 लाख कार विक्रीचे मारुती सुझुकीचे लक्ष्य आहे. कंपनीने 2015 मध्ये 2020 पर्यंत 20 लाख कार युनिट्सची विक्री करण्याचे लक्ष निर्धारित केले होते. कंपनीने आपल्या लक्ष्यामध्ये आता सुधारणा केली आहे. वितरकांबरोबर झालेल्या भेटीत कंपनीने गुंतवणूक वाढविण्यासाठी सांगितले आहे. काही वितरकांनी उत्पादन वाढविण्यासाठी क्षमतेत यापूर्वीच वाढ केली आहे.

2016-17 मध्ये कंपनीने 15 लाख युनिट्सची विक्री केली होती. कंपनीकडून गुजरातमधील प्रकल्पातील गुंतवणूक वाढविण्याचा विचार आहे. सानंद आणि हनसलपूर येथील प्रकल्पांचा विस्तार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. प्रवासी वाहन प्रकारातील विक्री वाढ होत असल्याने या प्रकारावर लक्ष देण्यात येणार आहे. गुजरातमधून प्रतिवर्षी 25 लाख कारचे उत्पादन घेण्याची कंपनीची क्षमता असून 2019 पासून नवीन लाईन कार्यरत होणार आहेत. या लाईनमधून दरवर्षी 20 लाख कारचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे.

Related posts: