|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » वर्षअखेरीस ‘बिटकॉइन’ला घरघर लागणार

वर्षअखेरीस ‘बिटकॉइन’ला घरघर लागणार 

नवी दिल्ली

 भारतासह जगात सनसनाटी निर्माण केलेल्या बिटकॉईन या पर्यायी चलनाची वर्षअखेरीस मोठय़ा प्रमाणावर घसरण होईल अशी चिन्हे आहेत. उगवत्या वर्षात तर त्याची आणखी कोंडी होऊ शकते, असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. गेले पंधरा दिवस या चलनाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून त्यामुळे त्यात गुंतवणूक केलेल्यांना मोठा फटका बसला आहे.

मंगळवारी या चलनाची किंमत 10 हजार 400 डॉलर्स होती. नंतर काही प्रमाणात ती स्थिर होऊन वाढूही लागली होती. बहुतेक सर्व पर्यायी चलनांच्या संदर्भात असे नेहमी घडते. काही सत्रांमध्ये त्यांची किंमत घसरते आणि त्यानंतर पुन्हा वधारते. तथापि, बिटकॉईनच्या संदर्भात वधारापेक्षा घसरणीची शक्यता अधिक आहे. या चलनात गुंतवणूक सावधपणे करावी, असा इशारा शेअरबाजाराची संबंधित संस्थांनी यापूर्वी दिला आहे.

बिटकॉईनची घसरण होत असली तरी त्याच स्वरूपाची इथेरियम आणि कार्डानो या चलनांच्या किमतींमध्ये मात्र वधार दिसून आला. त्यामुळे सर्वच पर्यायी चलनांसमोर संकट उभे नाही, हे दिसून आले. मात्र, भारतात बिटकॉईन हे चलन अधिक लोकप्रिय असल्याने त्यात गुंतवणूक जास्त आहे.