|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चीनशी लढण्यास भारत सक्षम

चीनशी लढण्यास भारत सक्षम 

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे प्रतिपादन

‘अभाविप’च्या 52 व्या कोकण प्रदेश अधिवेशनाचा शुभारंभ

प्रतिनिधी /रत्नागिरी

चीन हा आक्रमक आणि हावरट देश आहे. मात्र त्याच्या कुरापती भारतासमोर टिकू शकत नाहीत. आजच्या घडीला भारतीय सैन्य चीनशी लढण्यास पूर्णतः सक्षम आहे. मात्र भारताची सागरी सुरक्षेची बाजू चीनच्या तुलनेत कमकुवत असल्याची खंत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या खातू नाटय़मंदिरमध्ये भरलेल्या 52 व्या कोकण प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.

चीनची उंची केवळ 5 फूट 5 इंच असल्याचे महाजन यांनी खोचकपणे सांगितले. आपल्याकडील सैनिकांची उंची त्याहून अधिक आहे. डोंगराळ भागात छत्रपतीं शिवरायांचे मावळे ज्याप्रमाणे सहज लढू शकत होते, तीच ताकद आपल्या सैनिकांमध्ये आहे. बर्फाच्छादीत प्रदेशात स्वतःचे संरक्षण करण्यात आपले सैनिक कितीतरी पटीने आघाडीवर असून मनोबलही उंचीचे आहे. अधिक सोपे असते. तर चीनच्या विमानांच्या आड आपल्या देशाची भौगोलिक स्थिती अधिक आहे, त्यामुळे चीनला आपण घाबरून रहाणे चुकीचे आहे. तर भारताला 7600 किमीचा किनारा लाभला आहे, येथील व्यापार थांबविणे कठिण बाब आहे, त्यामुळे आपला आर्थिक कणाही कोणी मोडू शकत नाही.

ब्रिगेडियर यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला सांगितले की, देश विविध कारणांनी महान बनत असतो. मात्र जे देश महान आहेत त्यांच्यातील एक समान धागा असा की, तोच देश महान बनतो ज्या देशाचे नागरिक देशभक्त आणि देशप्रेमी आहेत. पण ते नुसते घोषणा देण्यापुरते नव्हे, तर कृतीशील नागरिकांची यासाठी गरज आहे. आज देशाच्या सीमांच्या बाह्य सुरक्षांबरोबरच देशातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अधिक जटील आहे. देशाची ही अंतर्गत सुरक्षा सामान्य माणसाच्या हाती आहे.

आज सोशल मिडीयाचे लोण मोठय़ा प्रमाणात आहे. ट्विटर, फेरबुक, व्हॉटस् ऍपसारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमांवर कोटय़ावधी भारतीय आहेत. ज्यांनी सोशल मिडीयावर येणाऱया दहशतवादी, संशयास्पद लिंक ब्लॉक केल्या पाहीजेत. तसेच त्या सायबर पोलिसांपर्यंत पोहोचविल्या पाहीजेत. 71 सालचे युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत पारंपरिक युद्ध करणे सोडून दिले आणि त्याने भारतातील अंतर्गत भागात दहशतवादी घुसवून मोठय़ा प्रमाणात लुडबूड करत आहे. दहशतवाद्यांकडून इंटरनेटवर आता दहशतवादी कोर्सेस देण्यात येत आहेत. त्यामुळे इतक्या मोठय़ा इंटरनेटच्या व सोशल मिडीयाच्या व्याप्तीवर लक्ष ठेवणे कठिण काम आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे, त्यामुळे सोशल मिडीयावरील ह्या दहशतवादावर लक्ष ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने कान, डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे.

यापुढे बोलताना ब्रिगेडिअर महाजन म्हणाले की, हे सांगायला मला आनंद होत आहे की, भारतीय सैन्याने केलेल्या अँटीटेरिरिस्ट ऑपरेशनमुळे भारतातील घुसखोरी तब्बल 95 टक्क्यांनी थांबलेली आहे. पूर्वीचे सुमारे 2500 घुसखोरांचे प्रमाण आता 250 वर आले आहे.

आपल्या देशात सर्वाधिक लोकप्रिय शर्मिला टागोरचा नातू तैमूर हा आहे. पहिल्या पाचमध्येही कोणी राजकीय नेता नाही. ही बाब निश्चितच आश्चर्यजनक आहे. कश्मिरला आता बंदुकीचा दहशतवाद थांबून दगडफेकीचा, सैबर वर्ल्डचा दहशतवाद सुरू झाला आहे.

येत्या 26 जानेवारीला इतिहास घडणार आहे. प्रतिवर्षी केवळ एकाच देशाचा पाहुणा दिल्लीतील संचलनाला येत असतो. यावेळी 10 दाक्षिणात्य देशाचे प्रमुख येणार आहेत. भारताचे हे पाऊल केवळ सर्वसाधारण असल्याचे समजू नये, तर हे भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण आहे. आज दाक्षिणात्य देश आपले चांगले मित्र बनू लागले आहेत. चीनच्या खुरापतींना मात देण्यासाठी अशाप्रकारचे आंतरराष्ट्रीय धोरण राबवून भारत राबवित आहे.

पाकिस्तान व अफगाणिस्तान हे आज ब्लॅक होल असल्याचे त्यांनी सांगितले. या देशांत कुणी गुंतवणूक केल्यास त्याचे आर्थिक नुकसानच नव्हे, तर बरबादी आहे. आज आपल्या देशातील नक्षलवाद-माओवाद ही एक मोठी समस्या आहे. ज्याला चीनचे मोठे पाठबळ मिळत आहे. आपले वैयक्तिक मत व्यक्त करताना ब्रिगेडियर महाजन म्हणाले की, आता याठिकाणहून अर्धसैनिक दलांना हलवून नक्षलवाद-माओवादी भाग आर्मीच्या हाती सुपूर्द करावा.

याचबरोबर आजच्या घडीला आपल्या देशाची सागरी सुरक्षा प्राधान्याने सक्षम, भक्कम करण्याची गरज आहे. अर्थात सागरी सुरक्षेत सुधारणा झाली आहे. मात्र ती अधिकाधिक भक्कम करण्यावर आपण जोर देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सागरी मार्गाद्वारे अनेक अवैध व दहशतवादी कारवाया होण्याचा धोका अधिक संभवतो.

आज मध्यमवर्गीय भारतीय मोठय़ा प्रमाणात परदेशात भटकंती करायला जातात. त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बस्तर भागातूनही भटकंती करावी. कारण याठिकाणी उद्योगधंदे सुरू होतील, येथील लोकांच्या हाताला काम मिळेल. बस्तर भागातील पर्यटनाला चालना मिळणे आज अत्यंत गरजेचे असल्याचे मत ब्रिगेडियर महाजन यांनी मनोगताच्या शेवटी व्यक्त केले.

अभाविपच्या या अधिवेशनाला स्वागतपर मनोगतात स्वागत समितीध्यक्ष राजन मलुष्टे यांनी कोकण अद्वितीय असल्याचे सांगितले. कोकणी माणूस शरिरापेक्षा विचारशक्तीने परिपूर्ण असल्याचे ते म्हणाले. कला, क्रीडासोबत आज व्यवसायाचा अंतर्भाव शिक्षणात करण्याची गरज व्यक्त केली. तर दहावी, बारावीप्रमाणे आयटीआयचे निकालही ठळकपणे प्रसिद्ध व्हावेत, असा विचार व्यक्त केला. युवा ऊर्जा योग्य दिशेला वळावी. तसेच पुस्तकी अभ्यासाबरोबर संशोधन संस्कृती निर्माण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

अधिवेशनाला व्यासपिठावर उद्घाटक ब्रिगेडियर हेमंत महाजन, अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. मंदार भानुषे, कोकण प्रदेशमंत्री अनिकेत ओवाळ, स्वागत समितीध्यक्ष राजेंद्र मलुष्टे, स्वागत समिती सचिव ऍड. श्रीरंग भावे, शहरमंत्री श्रीजीत वेलणकर, शहराध्यक्ष प्रा. प्रभात कोकजे उपस्थित होते. प्रास्ताविक मंदार भानुषे, तर मान्यवरांची ओळख प्रा. प्रभात कोकजे यांनी केली. यावेळी अभाविपच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कोकणाला बांग्लादेशी घुसखोरी पॅन्सर

सागरी सुरक्षा कोस्टल विषयावर नुकतेच मी एक पुस्तक लिहीले आहे. त्यानिमित्ताने कोकणात येण्याचा मला योग आला. गेली आठ वर्षे कोकणशी मी जोडला गेलो आहे. आज बांग्लादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला पॅन्सर आहे. कोकणात हा पॅन्सर बऱयाच प्रमाणात दिसून येत असल्याचे विधान यावेळी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. याठिकाणी अभ्यासताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, 33 कोटी देव आहेत म्हणून हा देश सुरक्षित आहे. या विधानाबद्दल कोणाला माझ्याकडून जाणून घ्यायचे असल्यास मला स्वतंत्र भेटण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.