|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मलनिस्सारण केंद्राची नगराध्यक्षांकडून पहाणी

मलनिस्सारण केंद्राची नगराध्यक्षांकडून पहाणी 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

इचलकरंजी येथील टाकवडे वेस परिसरातील मलनिस्सारण केंद्रातून मैलायुक्त पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याच्या वृत्तानंतर मंगळवारी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी या केंद्रास भेट देवून पहाणी केली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी संबंधित मक्तेदारास नोटीस काढणार असल्याचे सांगितले. त्यानंतर केंदाचे काम पुर्ववत होवून नदीत पाणी मिसळणे बंद झाले.

येथील टाकवडे वेस परिसरात मैलायुक्त पाण्यावर प्रक्रीया करणारे साडेपाच लाख लिटर क्षमतेचे मलनिस्सारण केंद आहे. गेल्या चार दिवसांपासून काही कारणास्तव या केंद्राचे काम बंद पडल्याने येथील मैलायुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. त्यामुळे नदीतील पाण्याचे प्रदुषण होवून त्याचा परीणाम इचलकरंजीसह परिसरातील ग्रामीण भागच्या सार्वजनिक आरोग्यावर होण्याची शक्यता होती. याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर मंगळवारी सकाळी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी या केंदाला भेट देवून पहाणी केली. यावेळी तेथील कर्मचाऱयांनी त्याच्या अडचणींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी संबंधित मक्तेदारस नोटीस काढणार असल्याचे सांगितले.

यानंतर दुपारी पाणीउपसा करणारे पंप सुरु करण्यात आले. त्यामुळे नदीत मिसळणारे सांडपाणी थांबले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Related posts: