|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डीकेटीईमध्ये मराठी विकीपिडीया संपादन कार्यशाळा उत्साहात

डीकेटीईमध्ये मराठी विकीपिडीया संपादन कार्यशाळा उत्साहात 

प्रतिनिधी /इचलकरंजी :

येथील डीकेटीई व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विकीपीडीया संपादन कार्यशाळा उत्साहात पार पडली. यावेळी समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

इंजिनिअरींग क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी व विविध विषयातील ज्ञान, तांत्रिक घडामोडी मराठी भाषेतून त्यांना उपलब्ध व्हावी हा या कार्यशाळेचा उद्देश होता. यावेळी बोलताना समन्वयक सुबोध कुलकर्णी म्हणाले, डीकेटीईच्या सहकार्याने इचलकरंजीमध्ये एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरवात या निमित्ताने झाली आहे. तसेच अधिकाधिक प्राध्यापक प्रशिक्षित होवून सातत्याने विकीसोर्स, विक्शनरी या इतर प्रकल्पातही काम करावी अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी प्राध्यापकांनी विकीपीडीयाच्या माध्यमातून आपले संशोधनात्मक ज्ञान विकसित करून संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन मनोगतात केले.

या कार्यशाळेत प्राध्यापकांनी सक्रीय सहभाग घेतला. विविध विषयावर लेख लिहीणे, असलेल्या लेखात भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे इत्यादी कामे मराठी विकीपिडीयावर केली. काही लेख नव्याने तयार केले गेले तर साधारण 250 संपादने करण्यात आली. या कार्यशाळेस विकीपीडीया संपादक सचिन वेंगुर्लेकर व ज्ञानदा गद्रे-फडके यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. डॉ. एस. बी. व्हनवट्टे, प्रा. आर. एन. पाटील व प्रा. वाय. एम. इंडी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रा. पी. एन. गोरे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. बी. बी. जंबगी यांनी आभार मानले.  

 

Related posts: