|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचा मार्गदर्शन मेळावा

बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचा मार्गदर्शन मेळावा 

वार्ताहर / बागायत:

बीएसएनएल लेबर ऍन्ड कॉन्ट्रक्ट युनियन महाराष्ट्र सर्कल भारतीय मजदूर संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्गचा कंत्राटी कामगारांचा मार्गदर्शन मेळावा नुकताच सिद्धिविनायक मंगल कार्यालय कसाल येथे झाला. मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

महाराष्ट्र परिमंडळाचे अध्यक्ष गणेश मठपती सरचिटणीस नरेंद्र वाकोडे, भगवान साटम, हरी चव्हाण, बीएसएनएल लेबर ऍन्ड कॉन्ट्रक्ट लेबर युनियन सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुधीर ठाकुर या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रवीण राजापूरकर, सरचिटणीस वासुदेव जोशी, खजिनदार संजय गावडे, सदस्य प्रदीप सावंत, भरत चौकेकर, रुपेश चव्हाण, प्रवीण परब, वामन बांबार्डेकर, नितीन रेडकर, रमेश चव्हाण, पंढरीनाथ पांगम, रुपेश गुडेकर, लक्ष्मण धुरी, भानुदास राणे तसेच जिह्यातील 300 हून अधिक कंत्राटी कामगार उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र परिमंडळाचे अध्यक्ष गणेश मठपती यांनी कंत्राटी कामगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत 10 हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून आपल्या संघटनेच्यावतीने कामगारांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपण करत आहोत. कंत्राटी कामगार किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ओळखपत्र व विविध मूलभूत प्रश्नांबाबत संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेत आहेत. सर्व असंघटित कंत्राटी कामगारांना संघटित कामगाराप्रमाणे समान वेतन कायदा लागू व्हावा, कंत्राटी कामगारांना आपत्कालीन दुर्घटनेत कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने याबाबत मोठा पेच निर्माण होतो. ठेकेदाराकडून कंत्राटी कामगारांना चार ते पाच महिने वेतन मिळत नाही. या सर्व मूलभूत प्रश्नांचा पाठपुरावा आपण वारंवार करत आहोत. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कामगाराच्या हिताच्यादृष्टीने योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने सर्व कामगारांच्यावतीने आंदोलनात्मक पद्धतीने आपली लढाई सुरू ठेवून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन गणेश मठपती यांनी दिले. सूत्रसंचालन व आभार सरचिटणीस वासुदेव जोशी यांनी मानले.