|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » जिओच्या ग्राहकांना आजपासून मिळणार हा फायदा

जिओच्या ग्राहकांना आजपासून मिळणार हा फायदा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

2017या वर्षात टेलिकॉम सेक्टरमध्ये हंगामा उडवून देणाऱया रिलायन्स जिओच्या नव्या प्लान्सचा धडाका यंदाच्या वर्षातही कायम राहणार आहे.

जिओ यूजर्सना आजपासून दोन नव्या प्लान्सची सुविधा मिळणार आहे. जिओने नव्या वर्षात दोन नवे प्रीपेड ऑफर्स आणलेत. जिओने 199 आणि 299 रुपयांच्या हॅपी न्यू ईयर प्लान लाँच केले आहेत. यात यूजर्सना आधीच्या तुलनेत अधिक डेटा मिळणार आहे.199च्या प्लानमध्ये यूजर्सला 1.2 जीबी हाय स्पीड 4जी डेटा मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री वॉईसकॉल, अनलिमिटेड एसएमएस आणि 28 दिवसांसाठी सर्व प्राईम मेंबरना जिओ ऍप्सचे सबसक्रिप्शन मिळेल. तर जिओने 299 रुपयांचा प्लानही लाँच केलाय. यात युजर्सना दररोज 2 जीबी 4 जी स्पीडने डेटा मिळेल.