|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आयएसचे 65 दहशतवादी अफगाणिस्तानात ठार

आयएसचे 65 दहशतवादी अफगाणिस्तानात ठार 

काबुल:

 अफगाणिस्तानच्या पूर्व भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत इस्लामिक स्टेटचे 65 दहशतवादी मारले गेले आहेत. अफगाणच्या अधिकाऱयांनी मंगळवारी याची पुष्टी दिली. नांगरहार प्रांतातील सरकारचे प्रवक्ते अताउल्लाह खोगयानी यांनी हसका मीना जिल्हय़ाच्या गोरेगोर आणि वंगोरा भागात हवाई मोहीम राबविण्यात आल्याची माहिती दिली. या कारवाईमुळे इस्लामिक स्टेटला मोठा झटका बसला आहे. इराक आणि सीरियातील वर्चस्व गमाविलेल्या या जागतिक दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानात तळ ठोकला आहे. अफगाणमध्ये अनेक विदेशी आयएस दहशतवाद्यांनी शिरकाव केला आहे. या मोहिमेत इस्लामिक स्टेटचे 65 दहशतवादी मारले गेले आहेत, तसेच कारवाईवेळी एका नागरिकाचा देखील मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. परंतु इस्लामिक स्टेटकडून या मोहिमेबद्दल कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. रविवारीच अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात नांगरहार प्रांताच्या पूर्व भागात इस्लामिक स्टेटचे 11 दहशतवादी मारले गेले होते.