|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » महाराष्ट्र बंद LIVE ; राज्यातील घडामोडींचे अपडेट्स

महाराष्ट्र बंद LIVE ; राज्यातील घडामोडींचे अपडेट्स 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेनंतर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली. हा बंद शांतेत करण्याचे अवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Updates

 • रायगड : महाडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण. ३ ते ४ दुकानांची तोडफोड. बंद दुकानांचे नुकसान केल्याने व्यापारी संतप्त, ५००  व्यापारी पोलीस ठाण्यात पोहचले , आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
 • मुंबईत कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आंदोलकांकडून तोडफोड, खुर्च्या, लाइट आणि पिण्याच्या पाण्याचे मशिन फोडले. 
 • मुंबई : घाटकोपर मेट्रो स्थानकात ट्रॅकवर उतरुन मेट्रो अडवली
 • घाटकोपरमध्ये संतप्त आंदोलकांडून जाळपोळ
 • भीमा  कोरेगाव हिंसाचाराचे लोकसभेत , राज्यसभेत  पडसाद ,विरोधकांची  चर्चेची मागणी 
 • पुण्यातील सुखसागर भागात आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली. तसेच एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी आंदोलन आक्रमक मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
 • मुंबई : हार्बर , मध्य  रेल्वे  वाहतूक  विस्कळीत 
 • घाटकोपर ते एअरपोर्ट रोड स्टेशनदरम्यान मुंबई मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम, 15 मिनिटांत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता, एअरपोर्ट रोड ते वर्सोवा स्टेशनची वाहतूक सुरळीत.
 • मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आजच्या परीक्षा रद्द नाही, विद्यार्थ्यांना एक तास उशिरा येण्याची मुभा
 • रत्नागिरी : आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग आणि चिपळूण-कराड मार्ग रोखला, बहादूर शेख नाक्यावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर
 • मुंबई : एसी लोकलच्या आजच्या फेऱ्या रद्द
 • पुणे : दांडेकर पूल चौकात ठिय्या आंदोलन, वाहतूक बंद पाडली.
 • ओला-उबर चालकांचा लांबच्या फेऱयांना नकार, ठिकठिकाणी आंदोलनं सुरू असल्यानं सावध पवित्रा.
 • पश्चिम रेल्वेवर नाला सोपारा स्टेशनात आंदोलक मोठय़ संख्येनं ट्रकवर उतरले… पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न.
 • नागपूर दक्षिण भागातील त्रिसरन चौकात बसवर दगडफेक, टायर जाळले..
 • पुणेः सिंहगड रोड परिसरात पीएमटी बसवर दगडफेक
 • अहमदनगरः तारकपूर बसस्थानकातून सकाळपासून एकही बस सुटली नाही, प्रवासीही तुरळक…
 • विरार स्टेशनात सकाळी साडेआठ वाजता दहा मिनिटांसाठी रेल रोको झाला.

 

 

 

Related posts: