|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्र बंद ; कोल्हापुरात 100 दुचाकींची तोडफोड

महाराष्ट्र बंद ; कोल्हापुरात 100 दुचाकींची तोडफोड 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर:

भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत कोल्हापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापुरात 100 दुचाकींची तोडफोड करण्यात आली तर केटीएम बसवर दगडफेक करण्यात आली आहे.

कोल्हापुरात येणाऱया बाहेरील बेळगाव आणि अन्य जिह्यातील एसटी बसेस अडवण्यात आल्या होत्या. बंदमूळे प्रवासी आणि पर्यटकांना सुद्धा हाल सहन करावे लागत आहेत. संभाजीनगर, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी परिसरात दुचाकीवरून बंदचे आवाहन करत कार्यकर्ते फिरत आहेत. दरम्यान आर. के. नगर या उपनगरात जमावाने टेम्पोची तोडफोड केल्याची माहिती आहे. संभाजीनगर परिसरात संतप्त जमावाने एकत्र येत काही काळ रास्ता रोको केला. तर पंचगंगा पुलावरसुद्धा आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. कोल्हापूर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा कार्यरत करण्यात आला आहे.