|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हळद व्यापाऱयाची वीस लाखांची फसवणूक

हळद व्यापाऱयाची वीस लाखांची फसवणूक 

प्रतिनिधी/ सांगली

 येथील एका हळद व्यापारी फर्मला कोईमतूरच्या तिघांनी 20 लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील एका हळद पेढीचे मालक भरत शिरीष अट्टल (30, या. मिरा हौसिंग सोसायटी समोर टिंबर एरिया) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.

अट्टल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोईमतूर येथील उदय मसाला कंपनीचे मालक कृष्ण कुमार त्यांची पत्नी सौ. प्रिया कृष्ण कुमार आणि त्या कंपनीचा परचेस मॅनेजर अरूण कुमार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत अट्टल यांच्याकडून उदय मसाला कंपनीने गतवर्षी 21 एप्रिल ते 24 मे 2017 या कालावधित 22 लाख 95 हजार 480 रूपयांची हळद पूड खरेदी केली होती. पण, त्यापैकी दोन लाख 81 हजार त्यांनी दिले. उर्वरित वीस लाख 14 हजार रूपये अद्यापही दिले नाहीत. पैसे देण्यात टाळाटाळ करत होता. त्यामुळे अट्टल यांनी बुधवारी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.