|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » भीमा-कोरेगाव घटनेत चुक ; राज्य सरकारचा केंद्राला अहवाल

भीमा-कोरेगाव घटनेत चुक ; राज्य सरकारचा केंद्राला अहवाल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दगडफेकीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे. या घटनेदरम्यान त्रुटी राहिल्याचे आणि षडयंत्र रचले गेले, असे राज्य सरकारने अहवालात मान्य केले आहे.

1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना तिथे दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून अनेक गाडय़ांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्य सरकारने भीमा-कोरेगावात घडलेल्या वास्तववादी घटनांचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला आहे. प्रशासकीय पातळीवर कोणत्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या न्यायालयीन चौकशीतून समोर येतील, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

 

 

 

Related posts: