|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Automobiles » सर्वात स्वस्त एसयूव्ही कार लवकरच होणार लाँच

सर्वात स्वस्त एसयूव्ही कार लवकरच होणार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:

इंडियन ऑटो मार्केटमध्ये डॅटसन कार कंपनी लवकरच आपली नवी आणि स्वस्त एसयूव्ही ‘डॅटसन गो क्रॉस’ ही कार लाँच करणार आहे.

ही कार भारतीय बाजारपेठेत लाँच होण्यापूर्वी जकार्तामध्ये 18 जानेवारीला लाँच होणार आहे, नोएडात होणाऱया ऑटो एक्सपो 2018मध्ये ही कार लाँच कण्रण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे. मार्च ते एप्रिल दरम्यान ही कार भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने या कारचे नाव ‘डॅटसन गो क्रॉस’असे केले आहे. या एसयूव्हीची पहिली झलक इंडोनेशियात पहायला मिळाली होती. या कारची किंमत जवळपास 4.5 लाखांपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीच्या टॉप मॉडलची किंमत 6.8 लाखांपर्यंत असण्याचा वर्तविण्यात येत आहे.

डॅटसन गो क्रॉस ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये लाँच केली जाणार आहे. पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 22 किमी/लि आणि डिझेल व्हेरिएंटचे मायलेज 30 किमी/लि च्या जवळपास असणार आहे. या गाडीत 7 इंचाची टचस्क्रीन असलेला ऍडव्हान्स स्टिरिओ ब्ल्यूटून कनेक्टिविटीसोबत असणार आहे,तर पॉवर विंडो आणि रियर पार्किंग सेंसर सारखे हायटेक फिचर्सही असणार आहेत.