|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात किसानपुत्र सर्वोच्च न्यायालयात जाणार ; अमर हबीब यांची माहिती

शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात किसानपुत्र सर्वोच्च न्यायालयात जाणार ; अमर हबीब यांची माहिती 

बीड / प्रतिनिधी : 
 शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात तसेच  शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका किसानपुत्र दाखल करणार असल्याची माहिती अमर हबीब यांनी बुधवारी तरुण भारतशी बोलताना दिली
६ व ७ जानेवारी १८ रोजी नागपूर येथे झालेल्या शिबिरात या विषयी सखोल चर्चा झाली. त्यावेळी याबाबतचा निर्णय झाला.  मकरंद डोईजड व अनंत देशपांडे हे दोन याचिका दाखल करतील. लोकसभा व विधानसभेत कायद्याच्या पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी अमर हबीब व प्रमोद चुंचूवार प्रयत्न करणार आहेत. याचिकेसाठी होणाऱ्या खर्चाचा भार महाराष्ट्रातील किसानपुत्रानी उचलावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘शेतकरीविरोधी कायदे का रद्द करावेत?’ या अमर हबीब लिखित मराठी पुस्तिकेचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर केलेल्या आवृत्तीचे येत्या फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे प्रकाशन करण्यात येईल.
येत्या ३ व ४ मार्च रोजी आंबेठाण (पुणे) येथे किसानपुत्र ३ रे राज्य स्तरीय शिबीर होणार असून प्रदीप गुट्टे व असलम त्याच्या तयारीला लागले आहेत.
१८ जून १९५१ रोजी भारताच्या मूळ घटनेत पहिली घटनादुरुस्ती करून तत्कालीन हंगामी सरकारने शेतकऱ्यांचे  मूलभूत अधिकार हिरावून घेतले. त्याचा निषेध करण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या मूळ घटनेची पुन:स्थापना करावी यासाठी मुंबई येथे ‘मूळ घटना पुन:स्थापना मागणी दिन’ साजरा केला जाईल. त्यासाठी मुंबई येथे विशेष कार्यक्रम होईल. प्रमोद चुंचूवार, डॉ आशिष लोहे व मकरंद जहागीरदार हे किसानपुत्र या कार्यक्रमात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: