|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहापूरच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

शहापूरच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास 

प्रतिनिधी /बेळगाव :

खडेबाजार शहापूर येथे दुकानदारांकडून करण्यात आलेले अतिक्रमण व विपेत्यांकडून रस्त्यावरच होणारे साहित्याची विक्री यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी पाहायला मिळत होती. ही वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व पोलिसांनी गुरुवारी संयुक्तरित्या कारवाई केली. अतिक्रमण केलेले साहित्य काढण्यात आले तसेच मुख्य रस्त्यावर विक्रीसाठी बसलेल्या विपेत्यांना दाणे गल्ली येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे शहापूरमधील रस्त्याने अनेक दिवसांनंतर मोकळा घेतला आहे.

नाथ पै चौकपासून कपिलेश्वर मंदिरापर्यंत दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. शिवाजी उद्यानासमोरील हातगाडय़ा अतिक्रमण निर्मूलन पथकाने ओढून नेल्या. नाथ पै चौकपासून ते खडेबाजारपर्यंत रस्त्याच्या शेजारी भाजी विपेते व इतर साहित्य विक्री करणाऱयांमुळे वाहतूकच्या कोंडीत वाढ होत होती. या विपेत्यांना मुख्य मार्गावरून हटवून त्यांना दाणे गल्लीत असणाऱया जागेत स्थलांतर करण्यात आले. तसेच तेथील विपेत्यांनी केलेले अतिक्रमण हटवून सर्वांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.

गोगटे सर्कंल येथील उड्डाणपूलाच्या कामाला सुरूवात करण्यात आल्याने वाहतूक कपिलेश्वर उड्डाणपूलावरून होत आहे. त्यामुळे नाथ पै सर्कंल ते शिवाजी उद्यान पर्यंत नेहमीच वाहतूकीची कोंडी होत असते. बेशिस्त पद्धतीने लावण्यात आलेली वाहने व रस्त्याशेजारी बसणारे व्यापारी यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीला शिस्त लावावी अशी मागणी वारंवार होत होती.

दाणे गल्ली येथे मनपाने जागा उपलब्ध करूनही विपेते रस्त्यावरच साहित्य व भाजीची विक्री सुरू होती. त्यामुळे अशा विपेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच दाणे गल्ली येथे जागेत बसण्याची सूचना करण्यात आली. दाणे गल्लीत मागील 25 वर्षांपासून अतिक्रमण केलेले शेड हटविण्यात आले. त्याठिकाणी साहित्याची विक्री करणे सहजशक्मय होणार आहे.

वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी विषम पद्धतीने पार्किंग करण्यासाठी देखील पोलिसांकडून मेहनत घेण्यात येत आहे. त्यामुळे शहराप्रमाणेच शहापूरमधील वाहतूकीला शिस्त लागत आहे. शहापूरमधील रस्ते खुले झाल्याने नागरिकांबरोबरच वाहन चालकांमधून कौतुक होत आहे. ही कारवाई अशीच सुरू रहावी. यामुळे वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

या मोहिमेसाठी मनपाच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता शेट्टर, एससीपी शंकर मारीहाळ, शहापूर पोलीस स्थानकाचे निरिक्षक जावेद मुशाफिरी, अतिक्रमण हटाव मोहीम पथकाचे गुंडप्पण्णावर, तसेच अधिकारी व कर्मचाऱयांनी प्रयत्न केले.