|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » भन्साळींच्या ‘पद्मावत’वर गुजरात,मध्यप्रदेशमध्येही बंदी

भन्साळींच्या ‘पद्मावत’वर गुजरात,मध्यप्रदेशमध्येही बंदी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

संजय लीला भन्साळींच्या आगामी ‘पद्मावत’ चित्रपटावर राजस्थानपाठोपाठ आता मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही बंदी घालण्यात आली आहे. ‘चित्रपटाचे नाव भलेही बदलले असेल पण हा सिनेमा मध्यप्रदेशात प्रदर्शित केला जाणार नाही’,असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवराज सिंह चौहान यांनी ‘पद्मावत’बाबतची भूमिका स्पष्ट केली. ‘जे सांगितलं ते सांगितलं. मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही. नाही म्हणजे नाही ’,असे चौहान म्हणाले. तर दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीही गुजरातमध्ये ‘पद्मावत’च्या प्रदशर्नावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले. राज्यात ‘पद्मावत’च्या विरोधात निदर्शनेझाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाव जरी बदले असले तरी ‘पद्मावत’च्या प्रदशर्नावर तांगती तलवार असल्याचे पहायला मिळत आहे.

 

 

 

 

Related posts: