|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » इन्सुलीत भरधाव डंपर धडकला

इन्सुलीत भरधाव डंपर धडकला 

कुंपणातील दुचाकीची हानी, मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधी / बांदा:

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-डोबाचीशेळ येथे रहदारीच्या ठिकाणी बेदकारपणे खडीवाहक डंपर हाकल्याने एका ऍक्टिव्हाचे नुकसान झाले. नेहमी गजबजलेल्या या बस थांब्यावर कोणीच उभा नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. रहदारीच्या ठिकाणी बेदरकारपणे वाहने हाकणाऱया चालकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

इन्सुली डोबाचीशेळ येथे सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱया डंपर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ज्या ठिकाणी डंपर महामार्गावरून शेजारील कुपंणात गेला तेथे नेहमी शाळकरी मुले तसेच बांदा, गोवा येथे जाणाऱया बससाठीचे प्रवासी उभे असतात. भरदुपार असल्याने तेथे कोणी नसल्याने अनर्थ टळला.

डोबाचीशेळ येथे सावंतवाडीहून गोव्याला प्रवासी वाहतूक करणारी सहा आसनी रिक्षा प्रवासी घेण्यासाठी थांबली. त्या रिक्षामागे एक टेम्पो होता. तोदेखील थांबला. मात्र, त्याच्या मागे असणारा खडी वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगाने असल्याने चालकाला तो आवरता आला नाही. डंपर चालकाने समोरच्या वाहनाला धडक बसणार म्हणून डंपर महामार्गावरून बाहेर नेला. हा डंपर शेजारील कुपंणात गेल्याने मोठे नुकसान झाले नाही. यात उभ्या असलेल्या दुचाकीचे फार मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. चालकाला डंपरमधून खाली उतरविले. मात्र, त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. काहीवेळातच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, याबाबतची नेंद पोलिसांत नव्हती.

Related posts: