|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » उद्योग » 2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाची थकबाकी सर्वाधिक

2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाची थकबाकी सर्वाधिक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या दोन वर्षात गृहकर्जाच्या उचलीमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. मात्र, ज्यांनी दोन लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेतले आहे त्यांची कर्जफेडीची थकबाकी सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. याउलट यापेक्षा अधिक कर्ज घेतलेल्यांनी त्याची फेड वेळेवर केली असल्याचे दिसून येते.

किफायतशीर घर योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. त्याच्या थकबाकीचे प्रमाण 11.9 टक्के इतके मोठे आहे. 2016-17 या वर्षात ही थकबाकी वाढली आहे. त्या अगोदरच्या वषी ही थकबाकी 6.1 टक्के होती. त्यानंतर ती 8.6 टक्क्मयांवर पोहोचली आणि वर्षअखेरीस तिने 11 टक्क्मयांचीही मर्यादा ओलांडली.

तथापि, समाधानाची बाब अशी की, एकंदर गृहकर्ज थकबाकीचे प्रमाण 1.5 टक्के असल्याचे दिसून आले आहे. किफायतशीर घर ही सरकारी योजना असून त्यासाठी कर्ज घेणाऱयाला व्याजात काही प्रमाणात सवलतही देण्यात येते. असे असूनही थकबाकी वाढली हे व्यवस्थापकीय अपयशाचे लक्षण मानले जात आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका विशेष मोहीम हाती घेण्याची शक्मयता आहे.

Related posts: