|Thursday, December 13, 2018
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोना उपांत्यपूर्व फेरीत

बार्सिलोना उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था/ नोयु कॅम्प

येथे सुरू असलेल्या किंग्ज चषक फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना क्लबने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. गुरुवारी झालेल्या दुसऱया टप्प्यातील सामन्यात बार्सिलोना क्लबने सेल्टा व्हिगोचा 5-0 असा दणदणीत पराभव केला

बार्सिलोना संघातील अर्जेंटिनाचा खेळाडू लायोनेल मेस्सीने 2 गोल नेंदविले. मेस्सीने बार्सिलोनाचे खाते 13 व्या मिनिटाला उघडले. 28 व्या मिनिटाला मेस्सीने संघाचा दुसरा गोल केला. सुवारेझने 31 व्या मिनिटाला बार्सिलोनाची आघाडी वाढविली. रेकिटेकने 87 व्या मिनिटाला बार्सिलोनाचा चौथा गोल केला या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात सेव्हिलाने कार्डीझचा 2-1 असा पराभव केला. इस्पेनॉलने लेवेन्टीवर 2-0 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

Related posts: