|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जबरी चोरी प्रकरणी एकास अटक

जबरी चोरी प्रकरणी एकास अटक 

प्रतिनिधी/ सातारा

शुक्रवारी रात्री यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिर परिसरातील राजपुरोहित स्वीटस् दुकानात तीन युवकांनी धुडघुस घालत मोडतोड करुन दहशत माजवण्याचा प्रकार केला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या तिघांनी तेथून पोबारा केला असला तरीही रात्री शाहुपूरी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल होवून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्याचे नाव अजय चंदू जगवार असे आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास अजय जगवार व त्याचे दोन मित्र गेले होते. त्यांनी राजपुरोहित स्वीटस्चे दुकानमाल नरफतसिंह रामसिंह राजपुरोहित यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी ती न दिल्याने त्या तिघांनी दुकानांची मोडतोड करत गल्यातील 9 हजार रुपयांची रोकड घेवून निघून गेले. पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसानी एकास अटक केली तर एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस तपास करत आहेत.

Related posts: